Terms of Use

नियम व अटी:

1 . मी दिलेली माहीती माझ्या आकलनाप्रमाणे खरी असून या माहितीच्या सत्यतेची पूर्ण जबाबदारी माझी राहील. सदर माहितीमध्ये काही खोटे अथवा चुकीचे असल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते याची मला जाणीव आहे.
2 . मी स्वेच्छेने विवाह नोंदणी करू इच्छिणाऱ्याला सर्व गोष्टींची कल्पना देऊन आणि त्यांची संमती घेऊन नोंदणी करत असून विवाहा संबंधीची सर्व जबाबदारी माझी राहील.
3 . अनुबंध विवाह केंद्र अनुरूप वधू आणि वर म्हणजेच स्थळे सुचविण्याची सेवा देणारी संस्था असून यापलीकडे किंवा या पेक्षा वेगळी अशी कुठलीही सेवा अनुबंध विवाह केंद्राकडून दिली जात नाही याची मला माहिती असून हे मला मान्य आहे.
4 . मी अनुबंध विवाह केंद्राला दिलेली सर्व माहिती अनुबंध विवाह अनुरूप स्थळांना पुरवू शकतात, त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करू शकतात अथवा इतर माध्यमांद्वारे एक अथवा अनेकांना पुरवू शकतात याच मला जाणिव असून त्यासाठी माझी परवानगी आहे.
5 . अनुबंध विवाह केंद्र अनुरूप स्थळ सुचविण्या व्यतिरिक्त हुंडा अथवा इतर कुठल्याही आर्थिक देवाण-घेवाणीच्या विरोधात असून अनुरूप स्थळांची अथवा त्यांच्या वतीने कुणीही काही आर्थिक देवाण-घेवाण केल्यास झालेल्या फसवणुकीची अनुबंध विवाह या संस्थेचा संबंध नसेल याची मला कल्पना असून हे मला मान्य आहे.
6 . अनुबंध विवाह केंद्र नोंदणीकृत व्यक्तींना अनुरूप स्थळे सुचविण्याचे काम करते, यासाठी जे काही सेवा शुल्क घेतले जाते ते ना परत शुल्क आहे याचा मला जाणीव असून ते मला मान्य आहे.
7 . अनुबंध विवाह केंद्राच्या सेवेमध्ये वधू आणि वर यांचा लग्नासाठी संमती मिळेपर्यंतच अनुबंध विवाह केंद्राची जबाबदारी राहील याची मला माहिती असून हे मला मान्य आहे.
8 . अनुबंध विवाह केंद्र व्यतिरिक्त इतर अस्थापना अथवा व्यक्तीकडून माझे अथवा मी नोंदणी केलेल्या वधू/वरचे लग्न जमल्यास अनुबंध विवाह केंद्राने आकारलेले सेवा शुल्क मला परत मागण्याचा अधिकार नाही आणि मी ते सेवा शुल्क पुन्हा मागणार नाही तसेच इतर ठिकाणावरून लग्न जमल्यास अनुबंध विवाह केंद्राला सदर गोष्टीची कल्पना देणे माझ्यावर बंधनकारक असून हे मला मान्य आहे.
9. माहिती व फोटो स्वतःच्या जबाबदारीने शेअर करणे, तसेच आर्थिक कुठल्याही प्रकारची देवाण घेवाण करू नये तसे केल्यास अनुबंध विवाह केंद्राची जबाबदारी राहणार नाही.
10. अनुबंध विवाह केंद्र यांच्या सर्व नियम व अटी मला मान्य असून त्यांचे पालन करण्यास मी कटीबद्ध आहे.
11 . अनुबंध विवाह केंद्राची सर्व सेवांविषयी मला माहिती असून, या सर्व सेवांच्या नियम व अटी मला मान्य आहेत.